जळगाव – जळगाव शहरातील मुकेश सैंदाणे या युवकाला कामाचे आमिष दाखवून जळगाव तील महिला सोलापूर येथील एका ऊसतोड ठेकेदाराला विकले.
याबाबत मुकेश व त्याच्या परिवाराला ही गोष्ट माहीत नव्हती जेव्हा मुकेश हा घरी आला नाही तेव्हा त्याच्या लहान भावाने शनिपेठ पोलीस स्टेशनला रीतसर हरवल्याची नोंद केली, त्यानंतर व्हाट्सअप दारा मुकेश चा लहान भाऊ प्रदीप यास त्याच्या मित्रांनी त्याचा सुगावा घेतल्यानंतर त्यांना कळले की हा युवक सांगली जिल्ह्यातील कोगडे या गावाजवळ आढळला त्यानंतर प्रदीप ने ही गोष्ट जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले यांना सांगितले व शनिपेठ पोलिस स्टेशनची दोघी जणांनी मदत घेऊन शनिपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटील व हेडकॉन्स्टेबल प्रकाश पाटील, मुकेश चा लहानभाऊ प्रदीप व जनमत प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पंकज नाले यांच्या मदतीने 600किलोमीटर लांब बानेवडी ता,जत गावाला जाऊन त्या युवकाला ताब्यात घेतले व सुरक्षित रित्या घरी आणले,, या यशस्वीतेच्या टीम मध्ये जत पोलिस स्टेशनचे पीआय मंगेश मोहिते शनिपेठ पोलिस स्टेशनचे प्रशांत देशमुख तडवी साहेब शरद पाटील व प्रकाश पाटील , अजिंक्य जाधव,यांचे अनमोल सहकार्य राहिले ,शनिपेठ पी आय हिरे साहेब व पोलिस उपाधीक्षक श्री विठ्ठल ससे , स्वप्न रंग संस्थेचे महेश राठी, विजय वानखेडे हर्षाली पाटील संजय कुमार सिंग यांनी त्यांचे कौतुक केले