Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जामनेर पंचायत समितीतील लाचखोर कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

by Divya Jalgaon Team
January 13, 2022
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जामनेर पंचायत समितीतील लाचखोर कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

acb image

जळगाव – गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर शेड काम सुरू करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात तीन हजारांची लाच मागून पंचायत समिती कार्यालयातच स्वीकारताना जामनेर पंचायत समितीतील कनिष्ठ लिपिकाला जळगाव एसीबीच्या पथकाने (गुरुवारी) आज सकाळी अटक केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. वसंत पंडीत बारी (53, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

जामनेर पंचायत समितीत स्वीकारली लाच
जामनेर तालुक्यातील शेवगे पिंप्री येथील 54 वर्षीय तक्रारदारांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरण मंजूर झाले मात्र शेड काम सुरू करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात आरोपी वसंत बारी यांनी 11 जानेवारी तीन हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराला तक्रार द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली व सापळा रचण्यात आला. गुरुवार, 13 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आरोपी पंचायत समिती कार्यालयातील आपल्या कक्षात लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आल्यानंतर कर्मचार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जर्नादन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

Share post
Tags: #ACB#अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे#एसीबीच्या पथकाने#जामनेर पंचायत समितीएसीबीचे पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे
Previous Post

एका युवकाची ऊस तोड कामगार कडून सुटका

Next Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १४ जानेवारी २०२२

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १४ जानेवारी २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group