जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात ६२ नवीन रुग्ण आढळून आले, तर ७४ बरे झाले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात चार तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-१२, जळगाव ग्रामीण-०४, भुसावळ-१४, अमळनेर-०३, चोपडा-०७, पाचोरा -०१, भडगाव ०१, धरणगाव ००, यावल ०२, एरंडोल ००, जामनेर ०१, रावेर-०७, पारोळा ००, चाळीसगाव ०७, मुक्ताईनगर-०२, बोदवड ०० व इतर जिल्ह्यातील ०१ असे एकुण ६२ रूग्ण बाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकुण ५३ हजार ४२१ रूग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५१ हजार ५०४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६४८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, मागील २४ तासात जिल्ह्यात एकही रूग्णाचा मृत्यू झाला नाहीय. जिल्ह्यात एकुण १ हजार २६९ रूग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९६.४१ टक्क्यांवर येवून पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.