जळगाव – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस केले असुन एकाला अटक केली त्याच्याकडून दीड लाख किमतीच्या आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत
मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार केले होते . त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक सुधाकर लहारे , स.फौ.अशोक महाजन यांच्या पथकातील विजय शामराव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार जमिल आयुब शेख (वय – 24) रा.पिपळगाव हरे , ता.पाचोरा जि.जळगाव याला अटक करण्यात आले. शेख ने औरंगाबाद शहरातुन देखील मोटार सायकली चोरी केल्याची शक्यता असुन अधित तपास पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे , अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाळे यांनी औरंगाबाद येथुन अधिक माहिती घेवुन पथक पुन्हा औरंगाबाद येथे रवाना केले.
या पथकाने केली कारवाई
अशोक महाजन , विजय शामराव पाटील , दादाभाऊ पाटील , नंदलाल पाटील , भगवान पाटील , सचिन महाजन , ईशान तडवी तसेच स.फौ.विजय पाटील , नरेंद्र वारुळे यांचे पथक स्थापन केले होते.
सदर पथकातील विजय शामराव पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की , पिपळगाव हरे ता.पाचोरा येथील रहीवासी जमिल आयुब शेख हा शेदुर्णी व पहुर भागात मोटार सायकलीची चोरी करुन त्या मोटार सायकली ची विल्हेवाट वाळुज , औरंगाबाद येथे लावीत असुन तो सध्या वाळुज एमआयडीसी शाजापुर औरंगाबाद येथे वास्तवास आहे.
त्याप्रमाणे वरील पथकाने औरंगाबाद येथे जावुन त्यास शिताफिने ताब्यात घेतले असता त्याने जळगाव एमआयडीसीसह शेदुर्णी , पहुर येथे चोरलेल्या एकुण 1लाख 55 हजार रुपये किमतीच्या आठ मोटार सायकली त्याचे कडेस मिळुन आल्याने त्याला एमआयडीसी पोलीस स्टेशन यांचे ताब्यात पुढील तपास कामी देण्यात आलेले आहेत .