चाळीसगाव- माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे ,जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या हस्ते चाळीसगाव तालुक्यातील वडाळा वडाळी येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सहकार क्षेत्रातील पदाधिकारी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
वडाळा वडाळी येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सहकार क्षेत्रातील पदाधिकारी माजी सरपंच नारायण अहिरराव, माजी सरपंच हिलाल अहिरराव , माजी विकासो चेअरमन युवराज अहिरराव , दत्तू पाटील, संजय अहिरराव, विकास आमले, हिरकणाबाई पाटील, गायत्री पाटील, लक्ष्मीबाई पाटील, रंजना पाटील, अनिता पाटील, आशाबाई पाटील, संगीता पाटील, किशोर आमले, भोजराज आमले, शिंपी सर, कुणाल पाटील, सतिष पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेश चिटणीस मनिष आमले, सरपंच अशोक आमले, बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती राजू माळी, विलास धायडे, सुनिल काटे, रुपेश भोसले, निरज आमले, शिवराज पाटील, योगेश कोलते, आदी उपस्थित होते.