Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

माजी महापौरांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

शहर पोलीसांनी जप्त केले धारदार शस्त्रे

by Divya Jalgaon Team
November 5, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
राकेश सपकाळे खून प्रकरणातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

जळगाव प्रतिनिधी । माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे यांचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघंही संशयीतांना शहर पोलीसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची सात दिवसांच्या पोलीस कोठडी रवानगी केली आहे. दरम्यान शहर पोलीसांनी अटक करण्यात आलेल्या संशयीतांकडून तलवार, चॉपर असे धारदार शस्त्रे जप्त केली आहेत.

शिवाजीनगरमधील राकेश सपकाळे हा तरूण बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास शिवाजीनगरातील स्मशानभूमी परिसरातून येत होता. त्यावेळी संशयित आरोपी गणेश दंगल सोनवणे रा. वाल्मिक नगर आणि विशाल संजय सपकाळे (साळुंखे) रा. राजाराम नगर यांच्यासह इतर दोन ते तीन जणांनी पुर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करीत हत्या केली होती. राकेश सपकाळे यांचा खून झाल्याची माहीती शहर पोलीसांना मिळतातच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

शहर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी मध्यरात्री संशयित आरोपी विशाल सपकाळे आणि गणेश सोनवणे या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातील तलवार, चॉपर, लाकडी दांडा जप्त केले. दरम्यान दोघांसोबत असलेले इतर संशयीतांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी पोलीसांनी केली असता दोघंही संशयीतांना सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.

Share post
Tags: Jalgaon crime newsJalgaon newsPolice Custodyपोलीस कोठडीमाजी महापौरांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी
Previous Post

घनकचरा व्यवस्थापन निधीमध्ये आयुक्तांच्या मदतीने कोट्यवधींचा घोळ !

Next Post

वडाळा वडाळी येथील भाजपा पदाधिकारी राष्ट्रवादीत

Next Post
वडाळा वडाळी येथील भाजपा पदाधिकारी राष्ट्रवादीत

वडाळा वडाळी येथील भाजपा पदाधिकारी राष्ट्रवादीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group