Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

by Divya Jalgaon Team
January 7, 2022
in जळगाव, राजकीय
0
शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव – आज अत्यंत विपरीत स्थिती असली तरी कुणी जीवन संपविण्याचा प्रयत्न करता कामा नये. दिवस हे परिक्षा घेणारे आणि संघर्षाचे असले तरी राज्य शासन हे शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते येथे  राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत १५ महिलांना प्रत्येकी २० हजार रूपयांच्या सहायता धनादेशाचे वितरण आणि आत्महत्याग्रस्त ३ शेतकर्‍यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये शासकीय मदतीने वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या  १८ ते ५९  वर्षे वयोगटातील कमावत्या  व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना तीन महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी  २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत धरणगाव तालुक्यातील  १५ महिलांना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे एकूण ३ लाख  मंजूर प्रस्तावाचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या  हस्ते वितरीत करण्यात आले. यामध्ये मंगलाबाई पाटील बोरगांव बु;, सुनंदा संदानशिव अहिरे खुर्द, आशाबाई पाटील कल्याणे खुर्द, निंबाबाई पाटील वाकटुकी, जिजाबाई भिल बाभळे , तुळसाबाई पाटील चांदसर, पुनम गोसावी झुरखेडा,  छाया भालेराव वाघळुद बुद्रुक; वसंताबाई  पाथरवट वाघळुद खु,र्द; रंजना  मोरे वाघळुद खुर्द; कविता पाटील वराड बुद्रुक; पुजा बाविस्कर साळवा, रिंकु भिल वराड बुद्रुक, अंजनाबाई पाटील पिंपळे खुर्द आणि सरला पाटील धरणगाव या महिलांना धनादेश प्रदान करण्यात आले.

याच कार्यक्रमात मौजे बोरखेडा येथील  मयत शेतकरी कैलास धनसिंग पाटील त्यांचे वारस म्हणून पत्नी संजूबाई कैलास पाटील यांना,  अतुल यशवंत देशमुख यांचे वारस पत्नी म्हणून रोहिणी अतुल देशमुख राहणार अनोरे यांना; किशोर सुरेश जाधव यांचे वारस पत्नी म्हणून ललिता किशोर जाधव राहणार पथराड बुद्रुक यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश व एक महिन्याचा किराणा व ब्लँकेट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी एरंडोल विनय गोसावी , तहसीलदार  नितीन कुमार देवरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख  गुलाबराव वाघ, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील,  पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे , प्रेमराजबापू पाटील, चर्मकार संघाचे भानुदास विसावे, चांदसर सरपंच सचिन पवार आदी मान्यवर उपस्थित होते

Share post
Tags: #dharangao news#राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गतpalakmantri gulabrao patil
Previous Post

जिल्हा परिषदेची स्थायी‎ समितीची ऑनलाइन सभा‎ आज होणार

Next Post

आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत

Next Post
आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत

आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group