जळगाव – आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत इकरा युनानी मेडीकल कॉलेज तर्फे इकरा रेसीडेंसीयल पब्लीक स्कुल येथे मेडीकल कॅम्पचे आयोजन
आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रंमा अंर्तगत इकरा युनानी मेडीकल कॉलेज तर्फे मेडीकल कॅम्पचे इकरा रेसीडेंसीयल पब्लीक स्कुल येथे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी इकरा रेसीडेंसीयल पब्लीक स्कुलचे प्राचार्य काजी झमीरुद्दीन , उपस्थित शिक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन माहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मो. अ. कुद्दुस व उप- प्राचार्य डॉ. शोएब शेख यांचे स्वागत केले.
या मेडीकल कॅम्प मध्ये प्राचार्य डॉ. मो.अ. कुद्दुस यांनी ओमिक्रोन विषाणु चे लक्षणे कोणते आहे ते विद्यार्थ्यांना सांगितले व त्यापासुन बचाव कसे करावे त्याची महीती दिली. या कॅम्पचे आयोजन विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करुन जर त्यांच्यात काही लक्षणे असतील तर वेळीच औषध उपचार करण्यात यावे हे उद्देश होते तसेच महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. शोएब शेख यानी पुढे निर्माण होणा-या परिस्थीतीस आपण कशा प्रकारे लढा देणार आहे व प्रशासन यावेळी सुद्धा सह्ज झालेले आहे. या कॅम्प मध्ये एकुण 103 विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासून त्यांना औषधी देण्यात आले. या वेळी इकरा युनानी मेडीकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मो. अ. कुद्दुस व उप- प्राचार्य डॉ. शोएब शेख डॉ. खान समीना, सय्यद मसुद अली, खान आसीफ़, शाहीद शाह व महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी डाक्टर उपस्थित होते.