मेष:- तुम्हाला परिवातील लोक मदत करतील. व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल.
वृषभ:- आज कामाच्या ठिकाणी सक्रिय राहाल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. दिवस हसत-खेळत जाईल. मित्रांची ऐनवेळी मदत मिळेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.
मिथुन:- आपल्या मनाचा आवाज ओळखावा. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. योग साधनेला अधिक प्राधान्य द्यावे. कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो. व्यावसायिक लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी.
कर्क:- मानसिक तोल सांभाळावा. अति खोलात जाऊ नका. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
सिंह:- व्यावसायिक लोकांनी सावधपणे वागावे. कोणावरही विसंबून राहू नका. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. जोडीदाराची प्रगती खुश करणारी असेल. लहान व्यवसायिकांना लाभदायक दिवस.
कन्या:- आज जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. इतरांचा सल्ला फार मनावर घेऊ नका. फसवणुकीपासून सावध राहावे.
तूळ:- तुमचे ज्ञान कामी येईल. संयम व विवेकाने वागावे. प्रेमी जीवनाला बहर येईल. सहकाऱ्यांची मोलाची साथ लाभेल. सामाजिक स्तरावर अनपेक्षित लाभ मिळतील.
वृश्चिक:- घरात अधिक वेळ घालवाल. छान मनमोकळ्या गप्पा होतील. जुने प्रयत्न फळाला येतील. वाहन खरेदीची इच्छा प्रकट कराल. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.
धनू:- तुमच्यातील सहनशीलता वाढीस लागेल. प्रतिकुलतेतून मार्ग काढता येईल. शांततेने इतरांची मते जाणून घ्या. कामाचा वेग वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.
मकर:- गोडीने सर्वांना जिंकून घ्याल. कौटुंबीक प्रगती साधता येईल. आवडते पदार्थ बनवाल. व्यापार्यांना अपेक्षित लाभ मिळेल. कौटुंबिक चर्चा सकारात्मक असेल.
कुंभ:- जोडीदार तुमच्यावर खुश होईल. तुमचे हट्ट पुरवले जातील. दिवस मनाजोगा घालवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका.
मीन:- परदेशी कंपनीकडून बोलावणे येईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. तज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा. मानसिक व्यग्रता जाणवेल. उधारी वसुलीसाठी प्रयत्न कराल.