जळगाव – ज्येष्ठ पत्रकार मानधन योजने विषयीचा प्रश्न तसेच पत्रकारांच्या समस्या संदर्भात सभागृहात आवाज उठविणार असून जिल्ह्यातील पत्रकारांच्या आरोग्यासाठी आवश्यक आरोग्य विमा (विमा कचव) उपक्रम हाती घेणार असल्याचे आश्वासन आ.राजूमामा भोळे यांनी दिले.
जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे ६ जानेवारी मराठी पत्रकार दिन सालाबादाप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र या वर्षी कोरोना निर्बंध नियम पाळून पत्रकार भवनात पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे, विश्वस्त मंडळ अध्यक्ष विजयबापू पाटील, विश्वस्त मंडळ कार्यवाह अशोकअप्पा भाटिया, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष दिलीप शिरुडे, ग्रामीण अध्यक्ष भिका चौधरी, कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब मोरेश्वर राणे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. सुरूवातीला पत्रकार संघाचे सरचिटणीस स्व. रितेश भाटिया यांच्या अकाली निधनाने जी पोकळी निर्माण झाली. याविषयी शोकभावना व्यक्त करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच जिल्हा भरातील कोरोना काळात मृत्यु पावलेल्या पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रास्ताविकातून जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष दिलीप शिरूडे यांनी पत्रकार संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला व आगामी काळात कोरोना निर्बंध पूर्णपणे शिथील झाल्यावर ज्येष्ठ पत्रकार व ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळणेबाबत तसेच पत्रकारांच्या अनेक समस्यांबाबत जिल्हा पत्रकार संघामार्फत शासन दरबारी व्यथा मांडणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयबापू पाटील यांनी ज्येष्ठ पत्रकार लढा समिती मार्फत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी विजयबापू पाटील यांची पुणे येथे प्रिमियम प्रिंटर्स को-ऑप. लि. येथे अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब मोरेश्वर राणे यांचा स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी म्हणून सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. पत्रकार संघातर्फे बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण पोटो प्रतिमा एरंडोल, पारोळा, सावदा- फैजपूर, जामनेर, भडगाव व इतर तालुका अध्यक्षांना प्रदान करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अल्पसंख्यांक सेल वर ज्येष्ठ छायाचित्रकार शब्बीर सैय्यद यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी बी. एम. चौधरी, पांडुरंग महाले, संदीपान वानखेडे, हेमंत पाटील, गोकुळ सोनार, केदारनाथ दायमा, संजय निकुंभ, प्रकाश तेलंग, भूषण हंसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सारंग भाटिया, अँड. रजनिष राणे, प्रविण बारी आदिंनी सहकार्य केले..