यावल, प्रतिनिधी । दि.२ जानेवारी रविवार रोजी यावल फैजपूर रोडवरील अंजली हॉटेल परिसराजवळ गावठी पिस्तुल व काडतूस सह संशयित आरोपीला यावल पोलिसांनी अटक केली आहे. गावठी पिस्तुल सह दिड लाख रुपयांचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यावल पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित युवराज घारू ( वय२१) रा. श्रीराम नगर असे अटक केलेले तरुणाचे नाव आहे . पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की यावल फैजपुर रोड वरील होटल अंजली समोर एका पान टपरी जवड संशयित आरोपी सुमित घारू हां गावठी पिस्तौल व जीवंत कारतूस गेहून फिरत असल्याची गोपनीय माहिती यावल पुलिस स्थानक चे पुलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली.
यावल पुलिस स्थानकाचे पथक रविवार २ जानेवारी रोजी दुपारी ६.३० वाजेच्चा सुमारास सापळा रचून संशयित आरोपी सुमित घारू याला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याचा जवळ २० हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तुल एक जिवंत कारतूस आढळून आले.
याशिवाय ५५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ७० हजार किमतीची ( एमएच१९ डी .पी १८७५ क्रमांकाची दुचाकी असा एकूण १ लाख ४५ हजार रु. किमतीचे मुद्देमाल हस्तगत केला आहे. यावल पोलीस स्थानकाचे पोलीस कॉस्टेबल सुशील घुगे यांच्या फर्यादिवरुन यावल पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करत आहे . विषय गंभीर आहे की आरोपी पोलीस स्थानकाचे साप सफाई कामगार म्हणून काम करीत होता . दरम्यान त्यांच्चा संशयस्पद हालचाली पोलीसांच्चा लक्षात आल्यामुळे त्याला कामावरून कमी करण्यात आल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली आहे.