मेष:- शारीरिक दृष्ट्या सक्षम राहाल. आजचा दिवस व्यस्त असेल. जवळचा प्रवास घडेल. उत्साहाने व जोमाने कामे तडीस न्याल. आर्थिक प्रश्न सुटेल.
वृषभ:- शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना दिवस लाभदायक असेल. धार्मिक कामात मदत नोंदवाल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. थोरांचे आशीर्वाद घेता येतील. उत्कृष्ट कल्पनाशक्ती लाभेल.
मिथुन:- कोणतीही चर्चा जास्त वेळ ताणू नका. अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकता. आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्यावे. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे.
कर्क:- जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संयमी भूमिका घ्यावी लागेल. नवीन योजनांवर अंमल करू शकाल. अचानक मूड बदलू शकेल. छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होऊ नका.
सिंह:- नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. सहकाऱ्यांशी संयमी भूमिकेतून वागावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विरोधकांकडे विशेष लक्ष द्यावे. गुप्त शत्रूंकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या:- पूर्वी शिकलेल्या गोष्टीतून लाभ मिळू शकेल. तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. मनातील प्रेमभावना व्यक्त करता येईल. नवीन पुस्तक खरेदी करू शकता. नवीन गोष्टीत रस घ्याल.
तूळ:- कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. घरातील थोरांच्या मतांचा आदर करावा. आपले विचार प्रभावीपणे मांडावेत. घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. मनातील चिंता दूर होतील.
वृश्चिक:- पराक्रमात वाढ होईल. आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. सहकाऱ्यांशी असणारे संबंध सुधारतील. भावंडांना मदत कराल. अति उत्साहात नसते उद्योग करू नका.
धनू:- कौटुंबिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. घाईने कोणतेही काम करायला जाऊ नका. दिवस आनंदात जाईल. बोलण्यात माधुर्य राखाल. चांगला आर्थिक लाभ संभवतो.
मकर:- कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. नवीन विचारांना चालना द्यावी. जोडीदारासोबत मन मोकळ्या गप्पा होतील. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. भविष्याची चिंता करत बसू नका.
कुंभ:- काही खर्च अचानक सामोरे येतील. आपल्या मतावर ठाम राहावे. आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. कोर्ट कचेरीची कामे वेळ घेतील. मानसिक व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा.
मीन:- कौशल्याने वागाल. व्यापार्यांना उत्पन्नात वाढ होईल. नवीन खरेदी करता येईल. जुने सहकारी भेटतील. मोठ्या भावंडांची मदत होईल.