जळगाव प्रतिनिधी । नेहरू नगरातील मोहाडी रोड परिसरातील दोन दुचाक्यावर पेट्रोल टाकून रात्रीच्या सुमारास जाळल्याची घटना घडली. याप्रकरणी एमएमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मोहाडी रोडवर असलेल्या नेहरू नगरात एका अपार्टमेंटच्या पार्किंग झोनमध्ये मध्यरात्री दोन दुचाकींना पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाम रामचंद नथाणी (वय-६१) हे मोहाडी रोड एक्झोटीका अपार्टमेंटच्या फ्लॅट नं. ३०४ मध्ये कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. अपार्टमेंटच्या खाली पार्किंग मध्ये त्यांच्या मालकीची पॅशन प्रो (एमएच १९ बीए १९८७) यांसह टिव्हीएस स्कुटी (एमएच १९ एक्स ६३१) अशी दोन वाहने त्यांनी २६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता पार्किंगला लावले. त्यानंतर कुटुंबिय झोपले होते. मध्यरात्री अज्ञात भामट्यांनी दोन दुचाकीवंर पेट्रोल टाकून दोन्ही दुचाकी पेटवून दिल्या. हा प्रकार काहीच्या हा प्रकार पहाटे ३ वाजेच्या सुमारास लक्षात आला. तोपर्यंत दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. शाम नाथाणी यांच्या तक्रारीवरुन सोमवारी २७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिसांत अज्ञात लोकांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोना नितीन पाटील करीत आहेत.