Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांचा माझ्यावर जीवघेणा हल्ला – रोहिणी खडसे यांचा आरोप

by Divya Jalgaon Team
December 28, 2021
in जळगाव, राजकीय
0
शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांचा माझ्यावर जीवघेणा हल्ला – रोहिणी खडसे यांचा आरोप

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आपल्यावर हल्ला चढविला असल्याचा आरोप जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या राहिणी खडसे यांनी नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मी सोमवारी २७ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे (एमएच १९ सीसी-१९१९) या क्रमांकाच्या कारने येत असताना अचानक त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. कारमध्ये यावेळी त्यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तीन जण शिवसेनेचे पदाधिकारी होते. एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यातील एकाने आमच्या कारमध्ये बसलेल्या बाजूने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर जोराने हल्ला चढविला. हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता. मात्र मी घाबरणारी नाही. हल्ला केल्या नंतर थोड्या वेळातच संशयित हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले. दरम्यान, बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप रोहिणी खडसे खेवलकर यांनी यावेळी केला आहे.

Share post
Previous Post

जळगावातील मोहाडी रोडवरील दोन दुचाकी जाळल्या, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

भाजपाच्या अल्पसंख्याक महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सना जहांगीर खान यांची नियुक्ती

Next Post
भाजपाच्या अल्पसंख्याक महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सना जहांगीर खान यांची नियुक्ती

भाजपाच्या अल्पसंख्याक महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सना जहांगीर खान यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group