जळगाव, प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्यावर गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. यानंतर काल हल्ला करण्यात आला असून याला राजकीय आयाम असण्याचा संशय आज राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी व्यक्त करत याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महानगरतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्ष मंगलाताई पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी विनोद देशमुख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गावगुंडांनी भ्याड हल्ला करून महिलांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांच्या सन्मानासाठी रोहिणीताई यांनी काही दिवसापूर्वी आवाज उठवून आक्रमक भूमिका घेतली होती. याचमुळे रोहिणी ताई यांच्यावर रात्री भ्याड हल्ला करण्यात आला. मतदार संघात महिला सक्षमपणे काम करत असल्याने त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादीच्या नेत्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी चेअरमन रोहीणीखडसे-खेवलकर यांच्यावर मुक्ताईनगर सेथील चांगदेव सुतगिरणी येथे प्राणघातक हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न ५ ते ७ गावगुडांनी केला. एखाद्या महिलेवर राजकीय राग मनात धरुन जीवनातून उठवण्याचा प्रयत्न करणे निषेधार्थ बाब असून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महनगर (जिल्हा) तर्फे तीव्र निषेध करीत असून गेल्या आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भय्या पाटील व महिला नेत्या रोहीणी खडसे खेवलकर यांना बोदवड येथील नगरपंचायत निवडणूकीवेळी अरेरावी व अर्वाच्या भाषेत शिवगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
यावेळी संपूर्ण जिल्हयातून कारवाई करण्यासंबंधीचे निवेदन आपणाकडे व जिल्हाधिकारी यांचेकडे देण्यात आले होते. परंतु खेदाने नमूद करावे वाटते की, आपणाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. दोन दिवसापूर्वीची मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी व त्यांच्या पत्नी यांच्या घरावही हल्लयाचा प्रयत्न करुन महिलेला धक्काबुक्की,पदरओढणे, हात ओढणे असे प्रकार करण्यात आले. याबाबत संबंधीत पो. स्ट. येथे गुन्हा नोदविण्यात आला. त्याबाबत काहीही कार्यवाही न झाल्याने या तालुक्यातील शिवसेनेच्या गावगंडांची हिम्मत वाढली असून सोमवार दि २७ डिसेंबर २०२१ रात्री झालेल्या हल्लयात बंदम,तलवार, कोयता, लोखंडी रॉड आदी प्राणघातक शस्त्राचा सर्रास वापर करण्यात आला. चारचाकी गाडीच्याही काचा फोडण्यात आल्या. परंतु वेळीच सावध भुमिका घेतल्याने हल्ला परतून लावण्यात आला. परंतु, या हल्लयामागे मोठे षडयंत्र असून या मागे एखाद्या मोठया नेत्याचा हल्लेखोरांवर वरद हस्त असू शकतो. तरी या प्रकरणी सखोल चौकशी करुन या राजकीय गुंडांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा पुढील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तिव्र स्वरुपाचे अंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.