भडगाव , प्रतिनिधी | तालुक्यातील वाक येथील गिरणा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत होता. वाळू वाहतुक विरोधी पथकाने वाळू रात्रीच्या गस्तीवेळी वाळू वाहतुक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई केली.
महसूल विभागाने केलेल्या कार्यवाहीत दोन ट्रॅक्टर वाहनांच्या चालक मालक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १ नोव्हेंबर रोजी रात्री च्या सुमारास वाक शिवारातील गिरणा नदी पत्रात ट्रॅक्टर चालक वाल्मिक आनंदा पाटील (एम. एच. २० – सी. टी. ४३२१), वाहन चालक मालक संजय सुरेश त्रिभुवन (एम. एच.१९- सी. टी. ६८२८) हे दोघं वाहने अवैध वाळू वाहतुक विरोधी पथकास वाळू भरताना सापडले.
त्यांच्याकडून सुमारे ३५०० रूपये किमतीची एक ब्रास वाळू मिळून आली. त्यांच्या विरूद्ध वडजी तलाठी विलास पांडुरंग शिंदे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांत गु र नं २९९/२०२० भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्याकडे आहे.