Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील २० वर्षीय विवाहितेचा गळफास घेऊन केली आत्महत्या

by Divya Jalgaon Team
December 18, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील २० वर्षीय विवाहितेचा गळफास घेऊन केली आत्महत्या

जळगाव, प्रतिनिधी । जोशी पेठ येथील राहणाऱ्या २० वर्षे विवाहितेचा राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील जोशीपेठ परिसरात राहणाऱ्या एका २० वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेत जीवन संपविले. तुम्पा वासुदेव घोराई (२०, मुळ रा.कोलकाता) असे विवाहितेचे नाव असून तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री जोशी पेठेत घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोलकाता येथील वासुदेव सनद घोराई यांनी तुम्पा यांच्याशी यापूर्वी नोंदणी पध्दतीने विवाह केला होता. आई-वडील चार ते पाच वर्षापासून जळगावात वास्तव्यास असल्यामुळे दोन महिन्यापूर्वी ते येथे आले होते. कुटूंबियांकडून विवाहाला होकार मिळाल्यानंतर वासूदेव व तुम्पा यांनी १३ डिसेंबर रोजी लग्न केले.

दि. १६ रोजी गुरुवारी रात्री जेवणानंतर वासुदेव व पत्नी झोपले होते. मध्यरात्री वासुदेव यांना लघुशंकेसाठी जाग आली. त्यानंतर ते पुन्हा त्यांच्या जागी आले. पंधरा ते वीस मिनिटानंतर पुन्हा जाग आल्यावर त्यांना पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले त्यांनी लागलीच पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पत्नी तुम्पा हिचा गळफास घेतल्यामुळे मृत्यू झाला होता. विवाहितेस जिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती मृत घोषित केले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस कर्मचारी किरण पाठक करीत आहेत.

Share post
Previous Post

सीएनजी – पीएनजीच्या किंमतीत पुन्हा वाढ, नवीन दर आजपासून लागू

Next Post

रावेर येथील कारवाईत एक कोटी रुपयांच्या ब्राऊन शुगरसह महिलेला अटक

Next Post
रावेर येथील कारवाईत एक कोटी रुपयांच्या ब्राऊन शुगरसह महिलेला अटक

रावेर येथील कारवाईत एक कोटी रुपयांच्या ब्राऊन शुगरसह महिलेला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group