मुंबई, वृत्तसंस्था । पाईपद्वारे घरोघरी पोहोचणाऱ्या एलपीजी आणि वाहन इंधन सीएनजीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमध्ये कराचा समावेश आहे. हे नवे दर शनिवारी सकाळपासून म्हणजेच १८ डिसेंबर पासून लागू झाले आहेत. सीएनजी व्यतिरिक्त एलपीजी पीएनजीच्या दरातही प्रति किलो दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता मुंबईत नवीन दर ६३.५० रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्याच वेळी, मुंबईतील पाइप नॅचरल गॅसची सुधारित किंमत ३८ रुपये प्रति युनिटवर गेली आहे., मुंबई महानगर प्रदेशात गेल्या ११ महिन्यांत सीएनजीच्या किमतीत १६ रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम महानगरातील आठ लाख ग्राहकांवर झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
मुंबईशिवाय लखनऊ, उन्नाव आणि आग्रा येथेही सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गॅसच्या खरेदी दरात वाढ झाल्याने हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरवाढीनंतर लखनऊ, उन्नाव आणि आग्रा येथे सीएनजीची नवीन किंमत शनिवारी सकाळपासून ७२.५० रुपये प्रति किलो झाली आहे. अयोध्येत ते ७२.९५ रुपये/किलो असेल. आतापर्यंत सीएनजीची किंमत ७०.५० रुपये प्रति किलो होती. लखनऊ आणि आग्रामध्ये, पीएनजीची किंमत प्रति मानक घनमीटर एक रुपये वाढून ३८.५० रुपये प्रति मानक घनमीटर झाली आहे.
सीएनजीच्या किमतीतील बदलाचा थेट परिणाम ३ लाख वैयक्तिक गाड्यांचा वापर करणाऱ्यांवर झाला आहे. याशिवाय ऑटो, टॅक्सी, बस या सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्यांना या वाढीचा फटका बसला आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांत चौथ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. टॅक्सी आणि ऑटोरिक्षा युनियनने यावेळी भाडेवाढीची मागणी केली होती. या वर्षी सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १६ रुपयांची वाढ झाल्यानंतर टॅक्सींचे किमान भाडे ५ रुपये आणि ऑटोरिक्षांचे भाडे २ रुपयांनी वाढले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल नाही
सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आजही चार महानगरांमध्ये दोन्ही पारंपरिक इंधनांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिवाळीपासून दोन्ही इंधनांचे दर स्थिर आहेत. नवीन दरानुसार, दिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर दराने विकला जात आहे. मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये, चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये आणि कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रति लिटर आहे.