जळगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अल्पसंख्यांक कक्ष सदस्यपदी जमील देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अल्पसंख्यांक कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून सदस्यपदी अँड. जमील देशपांडे यांची पाच वर्षाकारिता नियुक्ती करण्यात आली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे अल्पसंख्याक कक्ष कार्यान्वित करण्यासाठी दि. २५ ऑगस्ट २०१६ च्या अधिसुचनेद्वारे सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. सदर कक्षाद्वारे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या विविध विद्याशाखांचे व महाविद्यालयीन अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या संख्येबद्दल शैक्षणिक माहिती संकलित करणे, तसेच विद्यार्थ्याच्या दृष्टीने विविध कल्याणकारी योजना व शिष्यवृत्तीचा माहिती उपलब्ध करून देणे व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास व हित जोपासणे इ. कामे करण्यासाठी तसेच सदरचे कक्ष अधिक सक्षम करण्यासाठी व समितीचे स्वरूप व्यापक आणि सर्वसमावेशक होण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अल्पसंख्यांक कक्षासाठी सल्लागार समिती पाच वर्षांसाठी गठीत करण्यात आली आहे.
प्रभारी कुलगुरु यांच्या आदेशान्वये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अल्पसंख्यांक कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून सदस्यपदी अँड. जमील देशपांडे यांची पाच वर्षाकारिता नियुक्ती करण्यात आली आहे.
प्र कुलसचिव यांच्या सहीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. अल्पसंख्याक कक्ष अध्यक्ष कुलगुरू प्रा.ई वायूनंदन आहेत तर सचिव पदी डॉ मुनाफ शेख उपकुलसचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मा.कुलगुरु प्रा.ई वायूनंदन व अधिसभा सदस्य मा.दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता उत्तम काम करू असा संकल्प अँड.जमील देशपांडे यांनी केला आहे.