जळगाव, प्रतिनिधी । रावेर येथील कारवाईत एक कोटी रुपयांची ब्राऊन शुगर महिलेला अटक करण्यात आली असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व महसूल प्रशासनाच्या मदतीने करण्यात आली आहे.
एका महिलेस तब्बल एक कोटी रूपयांच्या ब्राऊन शुगर व हेरॉईनसह अटक करण्यात आली असून एलसीबीच्या पथकाने स्थानिक पोलिस व महसूल प्रशासनाच्या मदतीने ही कारवाई केली.
अलीकडच्या काळातील अंमली पदार्थ मिळण्याची ही सर्वात मोठी घटना असून याचे धागेदोरे राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय रॅकेटशी जुडले असल्याची शक्यता देखील असल्यामुळे ही कारवाई अतिशय महत्वाची मानली जात आहे. पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना रावेर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ चौकात एक महिला ब्राऊन शुगरसह येणार असल्याची माहिती मिळाली.
यानुसार पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव परिमंडळ रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव, व पोलीस निरिक्षक कैलास नागरे, रावेर पोलीस स्टेशन यांनी पथक तयार केले. या पथकाने छाप्याबाबत रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे, सपोनि योगीता नारखेडे, सपोनि शितलकुमार नाईक, पीएसआय विशाल सोनवणे, पोना. विनोद पाटील, हवालदार युनुस शेख इब्राहीम, मनोहर रघुनाथ शिंदे, सुनिल पंडीत दामोदरे, लक्ष्मण अरुण पाटील, किशोर ममराज राठोड, रणजित अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, ईश्वर पंडीत पाटील, अभिलाषा मुरलीधर मनार, योगिता संजय पाचपांडे, रमेश भरत जाधव, भारत पाटील, विजु जावरे, सुरेश आनंदा मेढे, प्रमोद सुभाष पाटील, सचिन रघुनाथ घुगे नेम.रावेर पो.स्टे. असे अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या सहकार्याने पथकाची निर्मिती केली आहे.
या पथकाने सापळा रचून रावेरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अख्तरी बानो पिता अब्दुल रऊफ (वय ४५ रा.मोमीनपुरा बडा कमेलापास ता.जि. बर्हाणपुर) हिला ताब्यात घेतले. या महीलेची तहसीलदार उषाराणी देवगुने यांच्या समक्ष झडती घेतला तिच्या कब्ज्यात एक कोटी आठ हजार रूपये मूल्य असणारे ५००.४ ग्रॅम हेरॉईनचे दोन कीट मिळुन आले. हेरॉईन हे ब्राऊन शुगरपासून तयार करण्यात आले होते. या महीलेस विचारपुस करुन अधिक माहीती घेता तीने संबंधीत हेरॉईन ही सलीम खान शेर बहादुर (रा. किटीयानी कॉलनी मंदसौर मध्यप्रदेश) याचे कडुन घेतल्याची माहीती दिली आहे. सदर महीले विरुध्द रावेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि कैलास नागरे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शितलकुमार नाईक करीत आहेत.