यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथुन रविवार ३२ वर्षीय विवाहित तरूण बेपत्ता झाला होता व मंगळवारी शेत विहिरीत मृतदेह आढळुन आला. तर या प्रकरणी मयत तरूणाच्या आईने सुन व तिच्या कुटुंबीय आणी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप करीता सतत जळगावातील काही संघटने कडून मुलाला आपच्या कुटुंबास दादागीरीची भाषा केली जात होती व या दबवामुळेचं आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप केला असुन या प्रकरणी चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल असे पोलिस निरिक्षकांनी सांगीतले आहे. तेव्हा कौटुंबीक वादाने त्रस्त अशा झालेल्या तरूणाच्या अशा मृत्यू मुळे गावातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.
किनगाव ता. यावल येथील तुषार गोपाळ राणे वय ३२ हा रविवारी मध्यरात्री पासुन बेपत्ता होता त्याची पत्नी रत्ना तुषार राणे यांच्यात वाद असल्याने ते विभक्त राहत होते व या कौटुंबीक वादामुळे नैराश्यापोटी तो घरातुन निघुन गेल्याची तक्रार आशाबाई गोपाळ राणे वय ६८ या वृध्द महिलेने केली होती दरम्यान मंगळवारी सकाळी गावालगत असलेल्या जितेंद्र राणे यांच्या शेत विहिरीत तुषार राणे याचा मृतदेह आढळुन आला तेव्हा तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह यावल ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आला येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला, डॉ. शुभम तिडके यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला तर या प्रकारणी बाळु गोपाळ राणे यांनी दिलेल्या खबरी वरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.
सुनचे जाच..
गेल्या सहा महिन्यांपासुन सुन व तिचे कुटुंबीय आणी विविध संघटनेच्या पदाधिकारी किनगावात वारंवार येवून दमदाटी करायचे, कोर्टात विविध ठिकाणी केसेस केल्या आहेत घटस्पोट करीता २५ लाखांची मागणी केली होती व पैसे लवकर उपलब्ध करावे म्हणुन नेहेमीच विविध संघटनेच्या तरूणांना सोबत घेवून सुन रत्ना ही मुलास व आम्हास त्रास द्यायची याचं जाचास कंटाळुन त्याने आत्महत्या केली असे मयत यांची आई अशाबाई राणे यांनी आरोप केला.
सीसीटीव्ही पुटेज बघा..
जळगावातील विविध संघटनेच्या तरूणांना सोबत घेवुन किनगावात येवुन घरासमोर अनेक वेळा तिने वाद विवाद केले याचे सीसीटीव्ही पुटेज या भागातील दुकानात मिळतील, अनेक खोट्या केसेस केल्या, आम्ही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला पण २५ लाख द्या अशी मागणी करीत ती सतत दम द्यायची व मागे आपल्या भाचीला देखील तिने त्रास दिला होता.
या घटनेत आधी हरवल्याची तक्रार व नंतर मृतदेह मिळून आल्याने अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे दोन्ही तक्रारीत कौटुंबीक वादाचे कारण नमुद असुन या प्रकरणी सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल असे पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांनी सांगीतले आहे.-पुर्ण-फोटो आहे