Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

युवारंग व एन.एस.एस. शिबिरांचे आयोजन करावे, सिनेट सदस्य अमोल मराठे यांची मागणी

by Divya Jalgaon Team
December 7, 2021
in शैक्षणिक
0

शिंदखेडा – विद्यापीठ स्तरीय युवारंग,
महाविद्यालय स्तरावर एन.एस.एस. शिबिरांचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी विद्यापीठ विकास मंचच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ई.वायूनंदन यांच्याकडे सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कोविडमुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता महाविद्यालये सुरू झालेली आहेत आणि विद्यार्थ्यांची महाविद्यालयात उपस्थितीही लक्षणीय वाढलेली आहे. महाविद्यालये बंद असल्यामुळे मागील काळात विविध स्पर्धा, स्नेहसंमेलने, शिबिरे, कार्यशाळा, इत्यादी सर्व
उपक्रमांपासून विद्यार्थी वंचीत होते. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळेल असे कोणतेही उपक्रम विद्यापीठ किंवा महाविद्यालय स्तरावर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेत बाधा निर्माण झालेली आहे. आता प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला सुरुवात झालेली असतांना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे महत्वाचे असल्याने विद्यार्थी विकास विभागाच्या अंतर्गत विद्यापीठ स्तरीय युवारंग, महाविद्यालय स्तरावर एन.एस.एस. शिबिरे, व्यक्तिमत्व विकास शिबिर, युवती सभा, स्वयंसिद्धा अभियान, विद्यापीठस्तरीय नेतृत्व विकास शिबीर, मैत्री शिबीर इ. उपक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन तात्काळ करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सभोवतालच्या विविध सामाजिक प्रश्नांची जाणीव होते, देशाप्रती असलेली आपली उत्तरदायित्वाची भावना जागृत होते, तसेच समाजाशी विद्यार्थ्यांची नाळ जुळून अधिक घट्ट होते.

शिवाय विद्यार्थ्यांना भविष्यात कधीही न अनुभवता येणारी महविद्यालयीन जीवनाच्या एका वेगळ्या अंगाची अनुभूती घेता येते. यासाठीच या सर्व उपक्रमांचे विद्यापीठाच्या वतीने याच सत्रात नियोजन – वेळापत्रक करून संबंधित विभाग व सर्व महाविद्यालयांना आयोजन करण्यासंदर्भात सूचित करावे अशी आग्रही मागणी विद्यापीठ विकास मचंच्या वतीने सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी केली आहे. तसेच ९ डिसेंबरला होणाऱ्या सिनेटच्या सभेत या विषयावर आवाज उठविणार असल्याचे अमोल मराठे यांनी कळविले आहे.

Share post
Tags: #शिबिरांचे आयोजन
Previous Post

शहरातील ज्ञानदेव नगरात घरफोडी, ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास

Next Post

शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
जळगावात घरसमोर उभी असलेली मोटारसायकल पेटविली

शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group