Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शहरातील ज्ञानदेव नगरात घरफोडी, ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास

by Divya Jalgaon Team
December 7, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील नवी पेठेतून २५ हजाराची रोकड लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बंद असलेले घर चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शनिपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानदेव नगरात जवानाचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिन्यांसह मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकदेव मानमोडे रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड जळगाव हे आर्मीत नोकरीला आहे. ते पत्नी अरूणा मानमोडे यांच्यासह दिल्ली येथे सध्या राहत आहे. त्यांचे ज्ञानदेव नगरात घर असल्याने खालचे राहते घराला कुलूप लावले होते तर वरचे घर भाड्याने दिलेले आहे. ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते ५ डिसेंबर दुपारी ३ वाजेच्या दरम्यान मानमोडे यांचे घर बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बंद घर पाहून घराच्या दरवाजाचे कडी व कोयंडा तोडून घरातील कपाटातून ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे कानातील जोडवे आणि १५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे नाणे असा एकूण ४५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आल्याने अरूणा मानमोडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार अरूणा मानमोडे यांनी त्यांचे वडील गोपाल नारायण दुबे रा. नेपानगर, बुऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) यांनी ज्ञानदेव नगरात असलेल्या घरी जावून चौकशी करण्याचे सांगितले. त्यानुसार गोपाल दुबे हे घरात येवून पाहणी केली असता चोरी झाल्याचे उघड झाले.

यावेळी शहरातील शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करण्यात आला. गोपाल दुबे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात सोमवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी शनीपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि यशोदा कणसे करीत आहे.

Share post
Previous Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जळगाव जिल्हा कार्यकारीणी घोषित

Next Post

युवारंग व एन.एस.एस. शिबिरांचे आयोजन करावे, सिनेट सदस्य अमोल मराठे यांची मागणी

Next Post

युवारंग व एन.एस.एस. शिबिरांचे आयोजन करावे, सिनेट सदस्य अमोल मराठे यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group