Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

तोतया पोलिस बनून दुचाकी लांबवली

अग्रवाल चौकात फर्निचर विक्रेत्याला गंडा

by Divya Jalgaon Team
December 6, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
तोतया पोलिस बनून दुचाकी लांबवली

bike chori

जळगाव प्रतिनिधी – पोलिस असल्याचे सांगून एकाने अग्रवाल चौकातून फर्निचर विक्रेत्याची दुचाकी घेऊन रफूचक्कर झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी रविवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्राळा हुडको परिसरातील ख्वाजानगर येथील शेख आसिफ शेख मुनाफ (वय ३२) हे अग्रवाल चौकात फर्निचर विक्रीचा व्यवसाय करतात. ४ डिसेंबर रोजी शेख आसिफ हे नेहमीप्रमाणे अग्रवाल चौकात असताना एक अनोळखी इसम आला. त्याने शेख आसिफ यांना नगर जिल्ह्यात गुप्त पोलिस असल्याचे सांगत नगर येथे आठवर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी तपासासाठी जळगावात आल्याची बतावणी केली.

पाेलिस असल्याबाबतचे बनावट आयकार्डही त्याने दाखवले. त्यानंतर तो याच ठिकाणी एका सोफा सेटवर झोपला. उठल्यानंतर जिल्हापेठ पोलिस स्टेशनला हजेरी लावण्यासाठी जायचे असल्याचे सांगत शेख आसिफ यांना त्यांची दुचाकी मागितली. शेख आसिफ यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्यास त्यांची (क्रमांक एम.एच.१९ ए.वाय.८२३२) दुचाकी दिली.

दुचाकी घेऊन गेल्यानंतर तो पुन्हा परतलाच नाही. शेख आसिफ यांनी भाऊ शेख युसूफ व इतरांसोबत शोध घेतला मात्र दुचाकी मिळून आली नाही अखेर रविवारी शेख आसिफ यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Share post
Tags: # दुचाकी लांबवली#nakli policeCrime newsDivya Jalgaon
Previous Post

जळगावला येणारा ४२ लाखांचा गुटखा जप्त

Next Post

मेहरुण येथे जखमी झालेल्या ३५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post
मेहरुण येथे जखमी झालेल्या ३५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

मेहरुण येथे जखमी झालेल्या ३५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group