Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मेहरुण येथे जखमी झालेल्या ३५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

by Divya Jalgaon Team
December 6, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
मेहरुण येथे जखमी झालेल्या ३५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी । मेहरूण परिसरात झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रकरणी संशयित आरोपींना अटक करून एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रामेश्वर कॉलनीतील मेहरूण परिसरात वादातून चाकूने सपासप वार करून जखमी केलेल्या पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे रा. रामेश्वर कॉलनी महेरूण या तरूणाचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. रामेश्वर कॉलनी परिसरातील सोळा खोल्या येथे सागर पूनम कंडारे आणि विशाल विजय सपकाळे रा. सिंध्दार्थ नगर रामेश्वर कॉलनी हे अज्ञात कारणावरून शनिवारी ४ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास वाद करत होते. त्यावेळी सागर कंडारे हा मोठमोठ्याने आवाज करून तुमच्या ‘एरीयाचा दादा पवन घातक याला बोलव, तो साला खूप माजला आहे, त्याला सुध्दा बघतो’ असे ओरडत होते.

त्यावेळी पवन हा त्याच्या घरात जेवन करत होता. त्याचा नावाचा उल्लेख केल्यामुळे पवन हा सागर आणि विशाल यांच्याकडे येवून दोघांच्या भांडणात माझे नाव कश्यामुळे घेत आहेत असा जाब विचारल्याने पवन आणि त्याच्या कुटुंबियाला सागर आणि विशाल यांनी शिवीगाळ केली. यात पवन दोघांच्या अंगावर धावून गेला आणि तिघांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान यात विशाल सपकाळे याने पवनला मागून पकडून धरले तर सागर कंडारे याने हातातील चाकूने पवन उर्फ घातक याच्यावर सपासप वार केले. यात पवन गंभीर जखमी झाला. त्याला शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. रविवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास पवन उर्फ घातकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पवनचा भाऊ प्रतिक मुकुंदा सोनवणे याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सागर कंडारे आणि विशाल सपकाळे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Previous Post

तोतया पोलिस बनून दुचाकी लांबवली

Next Post

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या शहराच्या किंमती

Next Post
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या शहराच्या किंमती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group