Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावला येणारा ४२ लाखांचा गुटखा जप्त

by Divya Jalgaon Team
December 6, 2021
in गुन्हे वार्ता
0
जळगावला येणारा ४२ लाखांचा गुटखा जप्त

जळगाव प्रतिनिधी – जळगावला येणारा गुटखा मालेगावहुन धुळे रोड येथे पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी मालेगाव येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेलं गुटख्याची किंमत ४२ लाख ५४ हजार रुपये असल्याचे समजते.

मालेगावकडून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर चाळीसगावरोड पोलिसांनी चाळीसगाव चाैफुलीपासून काही अंतरावर ट्रक (एम.एच-१५,जीव्ही-९७४१) अडवला. ट्रकचालक शेख हारून शेख हुसेन (वय ४८, रा. आझादनगर, मालेगाव), सहचालक मोहंमद शमीम मोहंमद सलीम (वय १९, रा. मालेगाव) यांना विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ट्रकची झडती घेण्यात आली.

त्यावेळी गोण्यांमध्ये भरलेला गुटखा, सुगंधित पान मसाला व तंबाखू मिळून आला. त्यांची एकत्रित किंमत सुमारे ४२ लाख ५४ हजार ८०० रुपये आहे. या कारवाईत २५ लाखांच्या ट्रकसह एकूण ६७ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, हा गुटखा नेमका कोणाचा होता व जळगाव येथे तो कोणाला पुरवण्यात येणार होता असे प्रश्न उपस्थित होत आहे.

Share post
Tags: #dhuleroad gutkha japt#gutkha japt#jalgaon gutkha
Previous Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, ६ डिसेंबर २०२१

Next Post

तोतया पोलिस बनून दुचाकी लांबवली

Next Post
तोतया पोलिस बनून दुचाकी लांबवली

तोतया पोलिस बनून दुचाकी लांबवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group