जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका नगरात बेकायदेशीर गावठी कट्टा काडतूस तलवारसह ओळखणाऱ्या एका तरुणाला तालुका पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी 3 रोजीच्या सायंकाळच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बिबा नगर परिसरात एक तरूण बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचा कट्टा, कडतुस आणि तलवार बाळगत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड, महेश महाले, रवींद्र मोतीराया, तुषार जोशी, संजय भालेराव, दिनेश पाटील, अशोक महाले, महिला पोलिस कॉन्स्टेबल शोभा न्याहळदे या पथकाने संशयित आरोपी अनिल रघुनाथ भोई यांच्या घराची शुक्रवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता झडती घेतली.
या झडतीत त्याच्या घरातून गावठी बनावटीचा कट्टा, ३ जिवंत कडतुस आणि लोखंडी तलवार आढळून आले. संशयित आरोपी अनिल भाऊ याला ताब्यात घेतले असून तलवार, गावठी कट्टा आणि कडतुस हस्तगत केले आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


