जळगाव, प्रतिनिधी । जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानापासून पेन्शन संघर्ष यात्रा काढण्यात आली असून, ३ डिसेंबर रोजी ही यात्रा जळगावात आली होती. या पार्श्वभूमीवर विविध वंचित क्षेत्रात सैदव कार्यतत्पर असणाऱ्या मराठा सेवा संघाच्या जळगाव विभागाने ता. ३ रोजी पेन्शन संघर्षयात्रेला व्यक्तिगत भेटत या यात्रेला पांठिब्याचे पत्र दिले.
यावेळी जळगाव शहराचे महानगराध्यक्ष व जलसंपदा विभागातील महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हिरामणराव चव्हाण व मराठा सेवा संघाचे सचिव चंद्रकांत देसले यांनी संघाचे प्रतिनिधित्व करत आंदोलकांना हे पत्र दिले. यावेळी पेन्शन संघर्षयात्रेच्या आंदोलकांनी मराठा सेवा संघ जळगाव विभागाने दिलेल्या पांठिब्याबद्दल त्यांचे आभार मानले.