जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिजाऊ नगरात चोरट्यांनी बंद घरावर डल्ला मारून ४४ हजाराची मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात पोलीस अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघ नगर परिसरातील जिजाऊ नगरात बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश खिवराज लखारा (वय-३५) रा. जिजाऊ नगर, आव्हाणे शिवार जळगाव हे कुटुंबियासह राहतात. सोनार काम करून उदरनिर्वाह करतात. २८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान ते दिवाळी निमित्त एक महिन्यासाठी गावाला गेले होते. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. बंद घर पाहून संधी साधत घराचे कडी कोयंडा तोडून घरातील ३७ हजार ६०० रूपयांचे दागिने आणि ६ हजार रूपयांची रोकड असा एकुण ४३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे २९ नोव्हेंबर रोजी उघडकीला आला. याप्रकरणी दिनेश लखारा यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.