Monday, March 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शेतीचा सामाईक बांध कोरल्याच्या कारणावरून पुतण्याला मारहाण

by Divya Jalgaon Team
November 29, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात चार तरूणांनी किरकोळ कारणावरून एकाला केली बेदम

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील पिंप्री बु. येथे शेतीचा सामाईक बांध कोरल्याच्या कारणावरून विचारपूस करण्यासाठी गेलेल्या पुतण्याला जबर मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मेहूणबारे पोलिस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील पिप्री ब्रु. येथील प्रविण राजेंद्र पाटील (वय-२६) यांनी शेतातील सामाईक बांध कोरल्याने तो आपल्या काकांकडे जाब विचारण्यासाठी गेला. मात्र वाद होऊ नये म्हणून तो लागलीच आपल्या घरी परतला. परंतु लगेच प्रविण पाटील यांच्या पाठीमागून काका संजय विक्रम पाटील, काकु मंगला संजय पाटील, कार्तिक संजय पाटील व हेमंत संजय पाटील हे येऊन शिवीगाळ करायला लागले. व कार्तिक यांनी त्यांच्या हातातील काठीने प्रविण पाटील यांना मारहाण केली. तसेच संजय पाटील व हेमंत पाटील यांनी त्यांच्या हातातील काठीने डाव्या खांद्यावर व पाठीवर जबर मारहाण केली.

यात प्रविण पाटील यांना गंभीर दुखापत झाली. हि घटना २७ नोव्हेंबर रोजी ८:३० वाजेच्या सुमारास घडली. तत्पूर्वी प्रविण यांनी आरडाओरड केली असता वडील राजेंद्र पाटील व आई सुरेखा पाटील धावून आले. परंतु त्यांनाही चापट बुक्क्यांनी व लाथांनी मारहाण केली. यात प्रविण याला गंभीर दुखापती झाल्याने त्याला उपचाराकामी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिस स्थानकात वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि पवन देसले करीत आहे.

Share post
Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुत्राच्या हळद समारंभास महापौरांची उपस्थिती

Next Post

प्रदेशाध्यक्ष जहाँगीर खान महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

Next Post
प्रदेशाध्यक्ष जहाँगीर खान महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

प्रदेशाध्यक्ष जहाँगीर खान महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group