जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांच्या आज सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 रोजी होणार्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने रविवार, दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी पाळधी (ता.धरणगाव, जि.जळगाव) येथील त्यांच्या निवासस्थानी हळद समारंभास महापौर जयश्री महाजन व महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांनी उपस्थिती देऊन चि. विक्रम व चि.सौ.कां. प्रेरणा यांना ओवाळणी टाकली.
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील तसेच शिवसेनेच्या आमदार व प्रवक्त्या मनीषा कायंदे यांचीही त्यांनी भेट घेतली.