चोपडा, प्रतिनिधी । येथील नामांकित आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने यंदाचा खान्देश भूषण व महाराष्ट्र गौरव पुरस्कार २८ नोव्हेंबर रविवारी जळगाव येथील अल्पबचत भवन याठिकाणी वितरित करण्यात आला.
शैक्षणिक, सामाजिक,काव्य,लेखन,पत्रकारिता, पर्यावरण संरक्षण व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण गट शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार जळगाव हे होते. ह्या वर्षी महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी प्रतिभा रूपेश कुमार पाटिल जळगाव (शैक्षणिक), प्रा.डॉ. दिनेश बबन देवरे,नंदूरबार (शैक्षणिक), प्रो.डॉ. उस्मान फकीरा पटेल राजवड़,ता.पारोळा(शैक्षणिक, सामाजिक), शेख असगर नजमोद्दीन, लासलगांव, जि.नाशिक (शैक्षणिक), अल्पसंख्यांक सेवा संघ जहांगीर खान जळगाव (समाजसेवा), सुनील प्रभाकर वाघ अमळनेर( क्रीडा,शैक्षणिक), प्रा.तंजीम हुसैन, चिखली(पत्रकारिता), नरेंद्र गुलाबराव बाविस्कर, पारोळा, ( शैक्षणिक, सामाजिक), डॉ हर्षल राजेंद्र खर्चे, बुलडाणा (क्रीडा), डॉ सरताज अली खान,मुंबई (शैक्षणिक,सामाजिक)फिरोज अली दोस्त मोहम्मद मुंबई (शैक्षणिक), यांची निवड करण्यात आली आहे तर खान्देश भूषण पुरस्कार २०२१ साठी अब्दुल करीम सालार,जळगाव(सामाजिक ,शैक्षणिक), सतीश दशरथ पाटील,करमाळ ता.पारोळा (शैक्षणिक,) श्रीकृष्ण सीताराम अहिरे,रांजणगाव ता.चाळीसगाव, शैक्षणिक,सामाजिक, प्रकाश भिका पाटील,मंगरूळ ता.अमळनेर (सामाजिक ,शैक्षणिक), विकास जगन्नाथ जाधव मंगरूळ ता.पारोळा( शैक्षणिक,सामाजिक), शफीकुर्रहमान शब्बीर अहमद जळगाव (शैक्षणिक सामाजिक), अब्दुल रशीद अब्दुल करीम जळगाव (शैक्षणिक), दिनेश सोपान पाटील जळगाव, शैक्षणिक सामाजिक, मोहसिन खान अजीज खान धरणगाव, शैक्षणिक, प्रवीण राजधर पाटील अमळनेर, शैक्षणिक, सामाजिक, गोपाळ कैलास अमृत शिरपुर, (शैक्षणिक, सामाजिक), सुषमा वासुदेव पाटील दहीवद, सामाजिक, कविता रमेश पाटील बोदवड (शैक्षणिक, सामाजिक), अलका जितेंद्र बोरसे सरवड धुळे, (सामाजिक), घनश्याम एकनाथ भामरे ह.मू.पालघर, (शैक्षणिक, सामाजिक), दीपक उखर्डु वाल्हे, अमळनेर (सामाजिक), साबीर खान शब्बीर खान,जामनेर, (शैक्षणिक, सामाजिक),शेख इरफान चिनावल(समाजसेवा) ,संतोष नामदेव पाटील पहूर (समाजसेवा) ह्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. त्याच प्रमाणे पवन दिवाकर कवाळे,दुसरबाडे, बुलडाणा यांना युवा कवी प्रेरणा म्हणून आणि फिरोज अनवर शाह वाशीम यांना पत्रकारितेसाठी विदर्भ गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यांचा करण्यात आला विषेश सत्कार याच बरोबर चोपडा तालुक्यातील चौगाव येथील विश्राम तेले यांनी पर्यावरण संरक्षणा साठी वृक्षारोपण, पाणि अडवा, पाणी जिरवा,झाडे लावा झाडे जगवा इत्यादि साठी उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. व अडवद येथील अँग्लो उर्दू हायस्कूल चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक फारूक पटेल अडावद,नवनियुक्त मुख्याध्यापक शब्बीर अहमद,लोकनियुक्त सरपंच भावना माळी अडावद, हकीम चौधरी मु .नगर,आसिफ खाटीक शिरपूर, अ.मजीद जकरिया,पाकिजा पटेल राजवड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्था अध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी केले तर जावेद शेख यांनी आभार व्यक्त केले. अंकुर साहित्य परिषद सहसचिव हकीम आर चौधरी मुक्ताईनगर,अब्दुल मजीद जकरीया जळगाव, अब्दुल करीम सालार जळगाव, ,लोकनियुक्त सरपंच भावना माळी अडावद,सरकारी वकील श्री कलंतरी, संभाजी ब्रिगेड चे दिनेश भाऊ कदम मुक्ताईनगर,मण्यार बिरादरी जिल्हाध्यक्ष फारूक शेख,अल्पसंख्यांक सेवा संघाचे अध्यक्ष जहांगीर खान,हाजी फजल सेठ अडावद,रि. मुख्या. फारूक पटेल अडावद,मुख्याध्यापक शब्बीर अहमद अडावद,पीआर माळी अडावद,नूरुद्दीन मुल्लाजी,अजमल शाह जळगाव,इम्रान खान अडावद ,जहांगीर पठाण अडावद, उपस्थित होते. यावेळी रोशन शाह,अब्दुल कादिर शेख,जुबेर शाह, अबुल मुजफ्फर शाह यांनी सहकार्य केले.