जळगाव, प्रतिनिधी । एडहॉक कमिटी महाराष्ट्र बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अधिपत्याखाली दि. १५ व १६ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे महाराष्ट्र बास्केटबॉल पुरुष व महिला संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महाराष्ट्र संघ निवड चाचणीसाठी प्रत्येक जिल्ह्यातून फक्त ५ खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पुरुष व महिला संघ निवड चाचणीत जळगाव जिल्हा ५ खेळाडू निवड करण्यासाठी जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली दि २८ नोव्हेंबर २०२१ रविवार रोजी डी.डी.एस.पी.महाविद्यालय एरंडोल येथील बास्केटबॉल मैदानावर जळगाव जिल्हा ५ खेळाडू निवड चाचणीचे आयोजन दुपारी ३ वाजता करण्यात आले आहे. खेळाडू उपस्थिति वेळ दुपारी ०२:३० वाजता राहिल.
जळगाव जिल्हा ५ बास्केटबॉल खेळाडू निवड चाचणीसाठी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुका / क्लब मधील फक्त ३ खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंनि जिल्हा निवड चाचणीत प्रवेश मिळविन्यासाठी आपल्या तालुका / क्रिडा मंडळाच्या लेटरहेड वर ३ च खेळाडू प्रवेशिका अनिवार्य राहिल.
खेळाडू निवड चाचणी कागदपत्र :- १) आधार कार्ड , २) जिल्ह्यातील रहिवासी असल्याबाबत सिद्ध होणारा पुरावा, ३) कोविड १९ दोन्ही डोस अथवा प्रथम डोस पूर्ण झाले त्या बाबतचे प्रमाणपत्र.
जळगाव जिल्हा ५ खेळाडू निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त तालुका / क्लब ने सहभागी व्हावे असे आवाहन जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष- अशोक जैन, संस्थापक – जयंत देशमुख, सचिव गिरीश पाटिल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी सचिव जितेंद्र शिंदे – ९९२३१२७३७३ यांच्याशी संपर्क साधावा.