जळगाव, प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान दि. 26 नोव्हेंबर या दिवशी देशातील सर्व नागरिकांनी स्वतःला अर्पण करून मान्यता दिली होती. त्यामुळे संविधान दिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या महत्वपूर्ण दिवसाचे औचित्य भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा तर्फे भाजपा जिल्हा कार्यालय वसंत स्मृती बळीराम पेठ येथे सकाळी १० वाजता भारतीय संविधान उद्देशिका पत्रिकाचे पूजन महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रम याप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी संविधान अर्पण दिवस व संविधान निर्मितीचा इतिहासाविषयी यावेळी माहिती सांगितली व त्या निमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी महापौर सदाशिव ढेकळे, सीमाताई भोळे, ज्येष्ठ नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राजेंद्र मराठे, रेखाताई कुलकर्णी, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, आघाडी अध्यक्ष लताबाई बाविस्कर, हेमंत जोशी, प्रमोद वाणी, प्रभाकर तायडे, सखाराम गावंडे, छायाताई सारस्वत, मंडल अध्यक्ष, रमेश जोगी, शक्ति महाजन, जयेश भावसार आदी बूथ प्रमुख, जिल्हा कार्यकारिणी,आघाडी अध्यक्ष नगरसेवक व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.