जळगाव – येथील दाणाबाजार येथे असलेल्या इंडियन बँक जळगाव बँक स्थलांतरित करण्यात आली. व.वा.वाचनालय च्या समोर असलेल्या इलाहाबाद बँक ची अधिकृत रित्या वर्ग होऊन आता इंडियन बँक जळगाव अशी नवीन बँक व वा वाचनालय येथे स्थित झाली.
बँकेचा उदघाटन सोहळ्या ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फेरिंगद्वारे बँकेचे झोनल ऑफिसर मुंबई क्षेत्रीय महाप्रबंधक संदीप कुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी संदीपकूमार गुप्ता यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
इंडियन बँक जळगाव प्रवेश सोहळाप्रसंगी बँकेचे ग्राहक तथा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुरज विजय नारखेडे, ज्येष्ठ चंद्रकांत सोनार, झोनल मॕनेजर महेश यादव, मुंबई झोनल अॉफीसचे व्यवस्थापनक संजय कुटे,शाखा प्रबंधक रोहित कुदानिया,दाणाबाजार बँकचे व्यवस्थापक मनोजकुमार गायकवाड, राहुल इंगोले, गुलाबराव मेश्राम यांच्यासह विविध क्षेत्रातील ग्राहक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नविन बँकेचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर बँकेच्या फलकाचे अनावरणसुध्दा झाले.