जळगाव – लेवा सम्राज्ञी फाउंडेनच्या वतीने नुकताच अखिल भारतीय लेवा महिला समाज भुषण पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्ववाचा ठसा उमटविणार्या तसेच संघर्षमय जीवन जगून विशेष कार्य करणार्या तब्ब्ल १२४ स्त्रीयांना फेसबुक गृपसह झुमअॅपद्वारे सुरु घेण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात लेवा सम्राज्ञी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ.केतकी पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले.
अखिल भारतीय स्तरावर लेवा समाज संघटित व्हावा त्यादृष्टीने कला, क्रिडा, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात समाजातील महिलांनी आपला वेगळा ठसा उमटविला अशा स्त्रीयांच्या कार्याची ओळख व्हावी या अनुषंगाने यंदाच्यावर्षी मार्च महिन्यात लेवा सम्राज्ञी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी डॉ.तारा चौधरी, डॉ.प्रमोद महाजन, रविंद्र चौधरी, पुरुषोत्तम पिंपळे, सुनील पाटील यांना निमंत्रित केले होते. यावेळी देशभरातील १२४ स्त्रीयांना सन्मानित करण्यात आले. त्यात अमेरिकेतील तनुजा नेमाडे यांचाही समावेश होता. ऑनलाईनद्वारे रंगलेल्या या सोहळ्यात स्त्रीयांनी आपले मनोगत व्यक्त केले,
त्यात संघर्षमय जीवन जगणार्या स्त्रीयांचे मनोगत ऐकतांना अश्रू अनावर झाल्याचे लेवा सम्राज्ञी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.ज्योती महाजन यांनी सांगितले. अखिल भारतीय लेवा महिला भुषण पुरस्काराचे आयोजन यशस्वीरित्यापूर्ण करण्यासाठी लेवा सम्राज्ञी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.ज्योती महाजन, उपाध्यक्षा पुजा भंगाळे, सचिव नीता वराडे, डॉ,अंजली भिरुड, रेखा बोरोले, अॅड.ज्योती भोळे, डॉ.सुनिता चौधरी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुनिता चौधरी, अॅड.ज्योती भोळे यांनी तर आभार निता वराडे यांनी मानले.