Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील पाळधी येथे एका २९ वर्षीय युवकाचा खून, एक जखमी

by Divya Jalgaon Team
November 27, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील पाळधी येथे एका २९ वर्षीय युवकाचा खून, एक जखमी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पाळधी येथे साईबाबा मंदिराजवळ तीन जणांनी कार अडवत दोघांवर हल्ला केला असून यात एकाचा खून झाला व दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

जळगावहून एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे हवाल्याचे १५ लाख रूपये घेऊन जाणार्‍यांची कार अडवत एका टोळक्याने यातील दोघांवर चाकूने हल्ला केला असून यात एक जण ठार तर एक जखमी झाला आहे. स्वप्निल रत्नाकर शिंपी (वय २९, रा. फरकांडे, ता. एरंडोल) यांचे कासोदा येथे धनदाई ट्रेडर्स या नावाचे शेतमाल खरेदीचे दुकान आहे. स्वप्निल हे शुक्रवारी दुपारी कासोदा येथून जळगाव येथे आलेले होते. सायंकाळी जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेतल्यानंतर कारने (एम.एच. ०१ ए.एल. ७१२७) त्यांच्याकडे कामाला असणार्‍या दिलीप राजेंद्र चौधरी (रा. फरकांडे) यांच्यासोबत गावी फरकांडे येथे निघाले होते. रात्री आठच्या सुमारास पाळधी येथील साईबाबा मंदिराच्याजवळ असलेल्या पेट्रोलपंपालगत तुमच्या कारने एका दुचाकीस्वाराला उडवले असल्याचा बहाणा करून त्यांच्या कारच्या पाठीमागून तीन दुचाकींवर चार जण आले. त्यांच्या कारसमोर दुचाकी आडवी लावली. यानंतर त्यांनी कारची चावी काढून स्वप्निल यांना बाहेर ओढले. तर दुसर्‍याने दिलीप चौधरी यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, स्वप्निल शिंपी यांच्याकडून बॅग हिसकावण्यासाठी हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. मात्र त्यांनी बॅग न सोडता ते जखमी अवस्थेत रस्त्याने पळत सुटले. या आरडाओरडमुळे हल्लेखोर बॅग सोडून पळून गेले. ही माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी दोन्ही जखमींना रूग्णालयात नेले. मात्र स्वप्नील शिंपी यांना मृत घोषीत करण्यात आले.

Share post
Previous Post

युवासेनेच्यावतीने भाऊसाहेब राऊत विद्यालयात दप्तर वाटप

Next Post

तालुक्यातील करमाड येथील विवाहितेचे दोन मुलांसह अपहरण

Next Post
महापालिकेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रूपयांचा दंड जळगाव प्रतिनिधी । शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार २० फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये शहरातील शहर वाहतूक शाखा आणि महापालिकेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर कारवाई करत १०५ जणांकडून ५०० रूपयाप्रमाणे ५२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. सविस्तर वाचा 👇 https://divyajalgaon.com/?p=9647

तालुक्यातील करमाड येथील विवाहितेचे दोन मुलांसह अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group