जळगाव, प्रतिनिधी । भाऊसाहेब राऊत विद्यालयात युवासेना महानगर प्रमुख स्वप्नील परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्याना दप्तर वाटप करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना प्रदेश विस्तारक किशोर भोसले, युवासेना प्रदेश सहसचिव विराज कावडिया, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख पियुष गांधी, युवासेनेचे महानगर प्रमुख स्वप्निल परदेशी, विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, पर्यवेक्षक एस.एम.रायसिंग व अरुणकुमार बाविस्कर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सुवर्णसिंग राजपूत यांनी केले. कार्यक्रमास सागर हिवराळे, विशाल वाणी,गिरीश सपकाळे, यश सपकाळे, हितेश ठाकरे,चेतन कापसे, अमोल मोरे, तेजस दुसाने, दिनेश सुर्वे, अमित जगताप, प्रितम शिंदे यांचेसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.