Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गेंदामिल परिसरातील ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन केली आत्महत्या

by Divya Jalgaon Team
November 25, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
गेंदामिल परिसरातील ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन केली आत्महत्या

जळगाव, प्रतिनिधी । एका ३० वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन या आत्महत्या केल्याची घटना २५ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील गेंदालाल मिल परिसरातील विजय माणिक महाजन (वय-३०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत नातेवाईकांसह पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील गेंदालाल मिल परिसरात विजय महाजन हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास असून शहरातील एका कंपनीत नोकरीस असून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. कौटुंबिक कारणावरुन विजय महाजन यांनी गुरुवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफार घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शेजाऱ्यांंच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर तात्काळ कुटुंबियांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने विजय याला खाली उतरवित जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मयत घोषीत केले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

Share post
Previous Post

जिल्ह्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची अडीच लाखात फसवणूक

Next Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २६ नोव्हेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २६ नोव्हेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group