जळगाव, प्रतिनिधी । दि. २४ रोजी बुधवारी सकाळी ११ वाजता इकरा युनानी मेडीकल कॉलेज येथे नवीन कोव्हीड लसीकरण सेंटरचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले होते. दि २४ पर्यंत 3500 लोकांनी लसीकरण करुन घेतले.
या लसीकरण सेंटरला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विशेष् बाब म्हणुन मंजुरी दिली होती. मुस्लीम समाजात लसीकरणचे प्रमाण फार कमी होते. या सेंटरला मंजुरी देल्यानंतर मुस्लीम समाजात लसीकरणचे प्रमाण वाढले आहे . जे भीतीचे वातावरण् होते ते दुर झाले समाजातील समज व गैरसमज दुर करुन लोकांना लसीकरणसाठी उत्साहीत करण्यात आले व समाजाकडुन आम्हाला तसा प्रतिसाद सुध्दा मिळाले आहे. त्या बद्वल आम्ही समाज बांधवाचे सुध्दा आभारी आहे. हे लसीकरण सेंटर इकरा एज्युकेश्न संस्था व संस्थेचे अध्यक्ष अ. करीम सालार, महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख् यांच्या परिश्रमाने सुरु आहे. या लसीकरण् सेंटरच्या माध्यमाने लसीकरणाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ् घ्यावे असे आव्हान करण्यात येत आहे.