Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील कानळदा रस्त्यावर भीषण अपघात, चालकासह एक महिला जागीच ठार

by Divya Jalgaon Team
November 25, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील कानळदा रस्त्यावर भीषण अपघात, चालकासह एक महिला जागीच ठार

जळगाव, प्रतिनिधी । कानळदा रस्त्यावरील आज सकाळच्या सुमारास लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टरने एका समोरील चारचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन जण ठार झाल्याचे समजल्याचे समजते.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास के.सी.पार्कजवळ भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीतील दोघे जागीच ठार झाले. अपघातात एक महिला व एक पुरुष जखमी झाले असून दोघांना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शहरात अपघातात दररोज कुणाचा तरी बळी जात आहे. बुधवारी डंपरच्या धडकेत एका अधिपरिचरिकेला आपला जीव गमवावा लागला होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास भादली येथील पाटील कुटुंबीय नातेवाईकाला भेटण्यासाठी भोकर येथे चारचाकी क्रमांक MH.14.FC.4550 ने जात होते. चालक बंडू पाटील हे होते. कानळदा रस्त्यावरील के.सी.पार्क जकात नाक्याजवळ समोरून भरधाव वेगात येत असलेल्या लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. अपघातात चारचाकीचा पुढील भाग चक्काचूर झाला असून चालकासह एक महिला जागीच ठार झाली आहे. तसेच एक महिला व एक पुरुष दोघे जखमी झाले असून त्यांना लागलीच उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून त्यांनीच जखमींना बाहेर काढले.

Share post
Previous Post

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य स्पर्धांना 15 डिसेंबरपर्यंत मुदत – मंत्री अमित देशमुख

Next Post

इकरा युनानी मेडीकल कॉलेजमध्ये ३५०० लोकांचे लसीकरण

Next Post
इकरा युनानी मेडीकल कॉलेजमध्ये ३५०० लोकांचे लसीकरण

इकरा युनानी मेडीकल कॉलेजमध्ये ३५०० लोकांचे लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group