Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दहा हजारांची लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटांना रंगेहाथ अटक

by Divya Jalgaon Team
November 24, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
दहा हजारांची लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटांना रंगेहाथ अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आरटीओ कार्यालय येथे वडिलांच्या नावावर बस हस्तांतरणासाठी करण्यासाठी दहा हजार रूपयांची लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटांना लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने रंगेहात अटक करून त्यांना अटक केली.

तालुक्यातील खेडी बुद्रूक येथील तक्रारदाराने प्रवासी बस विकत घेतली असून ही बस त्यांना त्यांच्या वडिलांच्या नावावर हस्तांतर करावयाची होती. यासाठी आरटीओ कार्यालयातील एजंट शुभम चौधरी व राम पाटील या दोघांनी तक्रारदाराला दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची खात्री व पडताळणी करून मंगळवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरटीओ कार्यालयात सापळा रचून दहा हजारांची लाच घेताना शुभम चौधरी याला रंगेहाथ पकडले. तक्रारीनुसार शुभम चौधरीचा साथीदार आरटीओ एजंट राम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. शुभम राजेंद्र चौधरी (वय २३, रा. कोल्हे हिल्स, जिजाऊनगर जळगाव) व राम भीमराव पाटील (वय ३७, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ जळगाव) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने अटक केल्याने आरटीओ कार्यालयाच्या परिसरात खळबळ उडाली होती.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, २४ नोव्हेंबर २०२१

Next Post

आजचे राशीभविष्य, गुरूवार, २५ नोव्हेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, गुरूवार, २५ नोव्हेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group