जळगाव, प्रतिनिधी । शहरातील चौघुले प्लॉट परिसरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका सलून व्यवसायिक तरुणाची चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.शहरातील चौघुले प्लॉट परिसरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका सलून व्यवसायिक तरुणाची चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस स्थानकातील पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहे.
शहरातील चौघुले प्लॉट परिसरात रात्री १० वाजेच्या सुमारास सुनील सुरेश टेमकर वय-३६ रा.प्रजापत नगर या तरुणाचा चाकुने भोसकून खून झाल्याची घटना घडली. तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यु झाला. दरम्यान अल्पवयीन मुलांच्या टोळीतील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्य संशयिताचा शोध सुरु होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते
ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापत नगरात सुनील सुरेश टेमकर वय 35 हा तरुण कुटुंबासह राहत होता. त्याचे चौघुले प्लॉट परिसरात सलून दुकान असुन त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. गेल्या ५ दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याचे दुकान बंद होते. रविवारीच त्याने दुकान उघडले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा दुकानावर आला. त्याने टेमकरला ब्लेड मागितले. टेमकर याने ब्लेड देण्यास नकार दिला असता दोघांमध्ये वाद झाला. या वादात अल्पवयीन मुलाने टेमकरवर छातीत चॉपरने वार केले. यात त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यु झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह शनिपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बळीराम हिरे व कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. अप्पर पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळाला भेट देत माहिती जाणून घेतली.
मयत पश्चात सुनील टेमकर याच्या पश्चात आई, पत्नी योगिता, मुलगा रोनक, मुलगी दीप्ती, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान टेमकर याच्यावर वार करणारा अल्पवयीन मुलगा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून तो सराईत गुन्हेगार असल्याची सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर शनिपेठ पाेलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचार्यांनी संशयितांबाबत माहिती काढली. यात लेंडी नाल्याजवळील पडक्या शाळेजवळ एका अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य संशयित अल्पवयीन मुलगा फरार असुन त्याचाही शनिपेठ शोध घेत आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते