जळगाव – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी प्रशासनातर्फे अद्याप ही शाळा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली नसून शहरातील किड्स गुरुकुल इंटरनॅशन स्कुल येथे बेकायदेशीर पद्धतीने शाळा सुरू असल्याची तक्रार बि.एम.पी. जिल्हाध्यक्ष पराग कोचुरे ह्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असुन या प्रकारामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना कोरोना झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी किड्स गुरुकुल इंटरनॅशन स्कुल व त्याच्या प्रशासनाची असेल असे तक्रारीत म्हटले आहे.
कोरोना काळात ५वी च्या खालचे विद्यार्थाबाबत सरकारने ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्याचे आदेश दिले असुन किड्स गुरुकुल इंटरनॅशन स्कुल येथे ५वी खालचे वर्ग प्रत्यक्ष स्वरुपात भरत असुन हा निव्वळ त्या आपल्या स्वार्थासाठी चिमुकल्यांचा जिव धोक्यात टाकत असल्याच्या प्रकार समोर आला आहे. सोशल डिस्टंसींग, मास्क व सैनिटायसेशनचे कोणतेही नियम न पाळणाऱ्या शाळेचा हा व्यवहार नुस्ताच बेकायदेशीरच नाही तर बेजबाबदार सुद्धा आहे.
कोरोना परिस्थितीचे गांभीर्य समजुन शासनाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, टप्या-टप्प्यात शाळा सुरु करण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र किड्स गुरुकुल इंटरनॅशन स्कुल येथे सर्व आदेशाना वेशीवर टांगुन ५वीच्या खालील वर्ग भरून कोरोना काळात सर्व नियमांना केराची टोपली दाखवत विध्यार्थ्यांचा जिव धोक्यात टाकत असून शाळेनेच सोशल मिडीया वर टाकलेल्या छायाचित्र या तक्रारीत जोडण्यात आली आहे. तसेच शहरात शाळेत असे गैरव्यव्हार सुरु असतांना राजकीय व शासकीय यंत्रणा झोप काढत असल्याचे म्हटले आहे.
तरी ह्या बाबतीत सखोल चौकशी करुन शाळा प्रशासन व सल्लीग्न शासकीय अधिकाऱ्यांवर योग्य कार्यवाहीची मागणी बि.एम.पी. जिल्हाध्यक्ष पराग कोचुरे ह्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असून किड्स गुरुकुल इंटरनॅशन स्कुलच्या सर्व शाखेचे CCTV फुटेज मागवुन त्यांना चौकशीसाठी जपण्याचीही मागणी ह्या तक्रारीत करण्यात आली आहे.