जळगाव, प्रतिनिधी । नारीशक्ती ग्रुप जळगावतर्फे दि. २० रोजी अमर संस्था संचलित मानव सेवा तीर्थ वेले तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे गरजूंना ब्लँकेट व औषधी वाटप करण्यात आली.
वेले चोपडा येथे मानव सेवा तीर्थ येथे मनोरुग्ण, दिव्यांग तसेच रस्त्यावर अनाथ अशा व्यक्तींना आश्रय देऊन अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गरजा भागविल्या जाऊन त्यांच्यावर औषधोपचार केला जातो. अशा लोकांची सेवा करण्यासाठी नारीशक्ती ग्रूप जळगाव यांनी पुढाकार घेऊन हिवाळ्याचे औचीत्य साधून अशा एकूण ७० गरजुंसाठी ब्लँकेट व औषधी वाटप करण्यात आली. जळगाव महापौर जयश्री महाजन यांनी औषधी उपलब्ध करून दिली.
याप्रसंगी नारीशक्ती ग्रुप जळगाव अध्यक्ष मनिषा पाटील, सुमित्रा पाटील, ज्योती राणे, भावना चौहान, नूतन तासखेडकर तसेच मानव सेवा तीर्थ व्यवस्थापक नरेंद्र पाटील, अजय राणा आदी उपस्थित होते. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, अरुणा धाडे कतार, प्रीती दोषी, नूतन तासखेडकर यांचे आर्थिक सहकार्य लाभले.