Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीच्या 229 जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

21‍ डिसेंबर रोजी होणार मतदान

by Divya Jalgaon Team
November 19, 2021
in जळगाव, प्रशासन
0
नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात तात्पुरते कारागृह

जळगाव, प्रतिनिधी । राज्य निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिकत् झालेल्या जळगाव जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीमधील 229 जागांसाठी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहील

  नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेच्या सुधारणा करण्याचा सोमवार 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत राहील. तहसिलदार सोमवार, 22 नोव्हेंबर, 2021 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करतील, नमुना ‘अ’ मध्ये नमूद ठिकाणी  30 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)  ते 6 डिसेंबर 2021 (सोमवार) रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविता व सादर करता येतील.

  मंगळवार, 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्र छाननी करण्यात येईल. गुरुवार, 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येईल. गुरुवार, 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. मंगळवार, 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल तर बुधवार 22 डिसेंबर 2021 रोजी (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्येतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) मतमोजणी होणार असून निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना सोमवार, 27 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

  रिक्त सदस्य पदांसाठी 12 नोव्हेंबर, 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात आली असून सदरची मतदार यादी 18 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतींमध्येही प्रसिध्दी केली आहे. जिल्ह्यात पोटनिवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकात म्हटले आहे.

Share post
Previous Post

पाच वर्षांच्या चिमुकलीला दुचाकीने दिली धडक, शहर पोस्टेत गुन्हा दाखल

Next Post

जळगावात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली ५७ हजाराची चोरी

Next Post
जळगावातील गंधर्व कॉलनीत घरफोडी, चोरटे पसार

जळगावात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली ५७ हजाराची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group