Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली ५७ हजाराची चोरी

by Divya Jalgaon Team
November 19, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील गंधर्व कॉलनीत घरफोडी, चोरटे पसार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून ५७ हजार रूपये किंमतीचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गणपती नगरातील विलास कैलास सोनवणे (वय-३३) हे खासगी वाहन चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. विलास सोनवणे यांच्या आजीचे वृध्दापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या दहाव्याचा कार्यक्रम असल्याने सोनवणे हे १४ नोव्हेंबर रोजी कुटुंबियांसह घराला कुलूप लावून जळगाव तालुक्यातील कंडारी येथे गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड, एलईडी टीव्ही, दोन पाण्याच्या मोटारी आणि गॅस हंडी असा एकुण ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घरात चोरी झाल्याचे शेजारी श्यामलाल अहुजा यांनी विलास सोनवणे यांना संपर्क करून सांगितले. याप्रकरणी विलास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Share post
Previous Post

जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीच्या 229 जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

Next Post

जळगाव जिल्हा कारागृहात दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी

Next Post
jail news

जळगाव जिल्हा कारागृहात दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group