जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका २६ वर्षीय विवाहितेला दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावे यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस स्थानकात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील आंबेडकर नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारीका सिध्दार्थ तायडे (वय-२६) रा. आंबेडकर नगर, जळगाव यांचा विवाह सिध्दार्थ जगदीश तायडे रा. आराधना नगर, वापी, वलसाड, गुजरात येथे रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरूवातील काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती सिध्दार्थ याने किरकोळ कारणावरून मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर माहेरहून गाडी घेण्यासाठी ५ लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला परंतू वडीलांची परिस्थीती हालाखीची असल्याने पैसे देवू शकले नाही. यासाठी सासरे, सासू व दीर यांनी टोमणे मारणे सुरू केले. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यांनी शनीपेठ पोलीसात तक्रार दिली.
याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून पती सिध्दार्थ जगदीश तायडे, सासू अशा जगदीश तायडे, सासरे जगदीश काशीनाथ तायडे आणि दीर संदीप जगदीश तायडे सर्व रा. वापी, गुजरात यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश पाटील करीत आहे.