Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चिखली शहरातील आनंद इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकाची निर्दयीपणे हत्या

by Divya Jalgaon Team
November 17, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
चाळीसगावात पाटणा देवी येथे ५० वर्षीय व्यक्तीचा खून, पोलिसात गुन्हा

चिखली, प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या दरोडे, चोरीच्या घटनांमुळे भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज, १७ नोव्‍हेंबरला पहाटे चिखली शहर व्यावसायिकाच्या निर्दयीपणे झालेल्या हत्‍येमुळे हादरून गेले आहे. काल, १६ नोव्‍हेंबरला रात्री पावणेदहाच्या सुमारास दुकानात शिरलेल्या दोन चोरट्यांनी आनंद इलेक्‍ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट यांची पोटावर चाकूचे वार करून हत्या केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्‍ही फूटेजमध्ये कैद झाला असून, एक चोरटा दुकानाबाहेर लक्ष ठेवण्यासाठी थांबलेला होता.

चिखली शहरातील जयस्तंभ चौक परिसरात कमलेश पोपट (५५) यांचे आनंद इलेक्ट्रॉनिक्स आहे. काल रात्री दुकान बंद करण्याची तयारी करत असताना त्यांनी दुकानाचे मुख्य शटर बंद केले. बाजूचे लहान शटर उघडे असताना तिघे जण मोटारसायकलने दुकानासमोर आले. त्यातील एक जण बाहेर थांबला. दोन जण ग्राहक बनून दुकानात शिरले. त्यांनी पोपट यांच्याशी झटापट करत पोटावर चाकूचे वार करून अत्यंत निर्दयीपणे त्यांचा खून केला. त्‍यानंतर काउंटरमधील रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले.

हा संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरोडेखोरांनी तोंडावर स्कार्फ बांधल्याचे दिसते. रस्त्यावरून जाणाऱ्यांना कमलेश पोपट जमिनीवर तडफडताना दिसले. घटनेची माहिती पोपट यांच्या कुटूंबियांना कळविण्यात आली. तातडीने पोपट यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. बुलडाण्यावरून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र श्वान दुकानाभोवतीच घुटमळले. रात्रीच नाकाबंदी करण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या असून, रात्रीपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी चिखलीत ठाण मांडून आहेत.

Share post
Previous Post

चाईल्ड पोर्नोग्राफीचे धागेदोरे जळगाव – धुळ्यात सीबीआय पथकाच्या छापे

Next Post

माजी सैनिकाचा खूनप्रकरणी पोलिसांनी काढली गुंडांची गावातुन धिंड

Next Post
माजी सैनिकाचा खूनप्रकरणी पोलिसांनी काढली गुंडांची गावातुन धिंड

माजी सैनिकाचा खूनप्रकरणी पोलिसांनी काढली गुंडांची गावातुन धिंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group