मुक्ताईनगर, प्रतिनिधी । तालुक्यात काही दिवसांपुर्वी माजी सैनिकांचा खून करण्यात आला होता. खून करणाऱ्या आरोपींना पकडून पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांनी गुडांची कुऱ्हा परिसरातून धिंड काढून जनतेमधील भिती दूर केली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरात गेल्या काही दरोडा, हत्या, काळे बाजारीकरण, अवैद्य धंदे, फसवणूक, अत्याचार, चोरी अशी विविध प्रकारची गुन्हेगारी आपले पाय पसरत आहे. या वाढलेल्या गुन्हेगारीच्या विरोधात परीसातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन दिले होते. या वाढत्या गुन्हेगारीची दाखल घेत पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी काही दिवसांपूर्वी घडलेल्या माजी सैनिकांच्या खुंनाच्या आरोपींना पकडून त्यांना कुऱ्हा परिसरात त्यांची जनतेतील भीती काढण्यासाठी धिंड काढण्यात आली.
याप्रकणी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक राहूल खताळ प्रतिक्रिया देत म्हणाले की, कोणत्याही प्रकारची गुंडगिरी व दबंगगिरी खपवून घेतली जाणार नाही. गुंडांची गावातून धिंड काढल्यामुळे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, एएसआय निकम, पोलीस अमलदार लाठे, पोलीस कॉन्स्टेबल सागर सावे, पोलीस कॉन्स्टेबल नावकर व कुऱ्हा पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे सर्व पोलिस कर्मचारी यांच्या कार्याची प्रशंसा केली करण्यात आली.